१५ रोजी दुपारी कळगाव येथे मतदान चालू असताना गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये ६ जण जखमी झाले होते. यातील ४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी १६ जानेवारी रोजी अंकुश गुमलवाड , नागोराव गुमलवाड , गोविंद यमलवाड, तानाजी यमलवाड, गोविंद नागोराव यमलवाड, मारुती सिंधीकर , शिवाजी गुमलवाड , केशव गुमलवाड , महेश नंदगाये , माधव गुमलवाड , आशिष बास्टे , नरेश गुमलवाड , बालाजी गुमलवाड , विष्णु पोरेवाड या १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ११ जणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली व उमरी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्व ११ जणांना १९ जानेवारी मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सध्या कळगाव येथे तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .
कळगाव मारामारी प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा ; ११ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:16 AM