नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावाच्या घळभरणीचे काम जलसपंदा विभागाकडून सुरु असून या भागातील शेतक-यांनी मावेजा वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे काम बंद पाडले आहे़ याप्रकरणी परिसरातील ६० हून अधिक शेतक-यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे नोंदविले.दरेसरसम साठवण तलावाच्या घळभरणीचे धरणामध्ये पाणीसाठा निर्माण करण्याचे काम प्रगत असताना प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी कामात अडथळा निर्माण करु नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले होते़प्रकल्पग्रस्त शेतक-यांंना संपादित जमिनीचा मावेजा वाढीव रक्कमेसह वाटप करण्यात आला असून संपादित जमिनीची खरेदी खाजगी वाटाघाटीने सन २०११ मध्ये पूर्ण झाली. संपादित जमिनीचा सातबारा शासनाच्या नावे असून शेतक-यांचा त्या क्षेत्रावर कुठलाही अधिकार नाही. तसेच चालू दराने जमिनीचे दर मागणे पूर्णत: नियमबाह्य व बेकायदेशीर आहे, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. मात्र मावेजा वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करीत २ जानेवारी रोजी शेतक-यांनी हे काम पुन्हा बंद पाडले़याप्रकरणी कनिष्ठ उपअभियंता पंकज शिंदे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरुन प्रमेध निळकेठे, तुकाराम आनमवाड, लक्ष्मण गादेवाड, साईनाथ आनमवाड, श्रीराम येलकेवाड, सदाशिव राठोड, रंगराव राठोड, प्रभू केरबा राऊत, भीमा सोमला राठोड, सुभाष तुकाराम आनमवाड यांच्यासह ६० शेतक-यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार आहे़
तलावाचे काम थांबविणाऱ्या शेतक-यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:06 AM
हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावाच्या घळभरणीचे काम जलसपंदा विभागाकडून सुरु असून या भागातील शेतक-यांनी मावेजा वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे काम बंद पाडले आहे़
ठळक मुद्देसाठवण तलावाच्या घळभरणीचे काम जलसपंदा विभागाकडून सुरुमावेजा वाढवून देण्याच्या मागणी