नांदेड- विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासात आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक झाले आहे.
2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. अपुरा औषध साठा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबर ला सहा जणांना जीव गमवावा लावला होता. तर गुरुवारी 5 ऑक्टोबर ला मागील 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे 4 दिवसात मयतांची संख्या 51 वर पोहचली आहे.
अधिष्ठातावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखलदरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.