रानडुकरांचा धुडगूस
हदगाव : तालुक्यातील पिकांवर रानडुकरांच्या कळपांचा धुसगूस सुरू आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. बरडशेवाळा, पळसा शिवारात हा प्रकार पाहावयास मिळतो. रानडुकरांपासून बचाव व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आष्टूरवर काँग्रेसचे वर्चस्व
लोहा : तालुक्यातील आष्टूर ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित ग्राम समृद्धी पॅनलने ११ पैकी ९ जागा मिळविल्या. विजय उमेदवारांमध्ये बाबासाहेब बाबर, सोनाली बंडे, रेखा ससाणे, कौशल्याबाई बाबर, चंद्रकलाबाई पवार, शिवाजी गुद्दे, अंजना खेडकर यांचा समावेश आहे.
उपाध्यक्षपदी दारमोड
धर्माबाद : येथील प्रा. नितीन दारमोड यांची वीर भगतसिंघ विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी राजे पाटील यांनी केली. दारमोड यांचे या नियुक्तीबद्दल अनेकांनी स्वागत केले.
देशपांडे गटाचे वर्चस्व
मुखेड : तालुक्यातील बाऱ्हाळी ग्राम पंचायतीवर काँग्रेस पक्षाच्या देशपांडे गटाने १५ पैकी १० जागा मिळविल्या. चंद्रकांत देशमुख यांचे, राजन देशपांडे तसेच हनमंत वाडीकर यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. देशपांडे पॅनलचे विजयी उमेदवार असे- आबासाहेब जाधव, अर्चना जाधव, अमिनाबी शेख, अंजली देशपांडे, व्यंकटराव वळगे, पूजा वाघमारे, मारोती वाघमारे, महेबूब बागवान, रुपाली फिरंगवाड, मनोरंजना उमाटे.
नियोजन समितीची बैठक
नांदेड : जिल्हा नियोजन समितीची बैठक २५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नियोजन भवनात होणार आहे. बैठकीला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहील. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
मोबाइल लंपास
अर्धापूर : येथील फुलेनगरातील शुभम बोराटे हा ऑनलाइन अभ्यास करून झोपी गेला होता. चोरट्यांनी त्याचा मोबाइल लांबविला. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.