लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली़राज्य शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून उल्लेख केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांना दिवाळीत कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती़, परंतु आॅफलाईन आणि आॅनलाईनचा अनेक दिवस गोंधळ सुरु होता़ कर्जमाफीसाठीचे अर्ज दाखल करताना शेतकºयांच्या नाकीनऊ आले़ त्यात बँकांकडूनही काही ठिकाणी शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला. या योजनेत शेतकºयांना १ लाख ५० हजारांपर्यंत तर नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २०१७ अखेर २ हजार ३३१ शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ६ लाख २२ हजार ९८६ रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात २४ हजार ३८० शेतकºयांच्या खात्यात ३० कोटी १३ लाख ९३ हजार ९०१ रुपये जमा करण्यात आले़ तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांकडून ११ डिसेंबर २०१७ अखेर ५७ हजार २३९ शेतकºयांच्या खात्यात ३५९ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यात एकूण ८३ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा केले आहेत.या योजनेतंर्गत शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकºयांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकºयांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. ज्या शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कजार्बाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकºयांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरित सर्व पात्र शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे फडणीस यांनी सांगितले़४योजनेत शेतकºयांना दीड लाख व नियमित कर्ज परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर रक्कम४आॅनलाईन आणि आॅफलाईनच्या घोळात शेतकरी आले होते मेटाकुटीला४अर्जांची दुरुस्ती सुरुच
नांदेड जिल्ह्यातील८३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:56 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात ३९६ ...
ठळक मुद्दे३९६ कोटी ४२ लाख खात्यात जमा: अर्जातील त्रुटींची तालुकास्तरीय समिती करणार दुरुस्ती