लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या वतीने आयुर्वेदिक, होमिओपॅथीक आणि युनानीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ज्या महाविद्यालयात हे प्रवेश होणे अपेक्षित होते, अशा २६ महाविद्यालयांना प्रवेशाच्या शेवटच्या फेरीत मान्यता देऊन त्या फेरीतून उरलेल्या जागा संस्थास्तरावर वर्ग करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हजारो राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे.सध्या राज्यातील आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, युनानी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयुर्वेदिकची ७० महाविद्यालये, होमिओपॅथीकची ४८ महाविद्यालये तर युनानीच्या ६ महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळावा व राखीव प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी गतवर्षी २०१७ साली राज्य सामाईक प्रवेश कक्षाने मुंबईस्थित समुपदेशन प्रवेशफेरी घेतली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश सुकर झाले होते. परंतु, आयुष मंत्रालयाने सुमारे २६ महाविद्यालयांना १५ आॅक्टोबरनंतर मान्यता दिली़ त्यामुळे या महाविद्यालयांतील बहुतांश जागा रिक्त आहेत. या जागा संस्थास्तरावर भरण्यासाठीचे सूचनापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केले आहे. या संस्थास्तरावरून भरलेल्या जागांसाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनादेखील संपूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. राखीव प्रवर्ग तसेच कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी मुंबईस्थित समुपदेशनफेरी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री तसेच राज्य सीईटी कक्षाकडे शैक्षणिक सल्लागार गणेश तिडके यांनी दिले आहे़ दरम्यान, सदर विभागाने मागील वर्षीप्रमाणे शेवटच्या फेरीआधी मुंबईस्थित समुपदेशन फेरी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकवर्गातून जोर धरत आहे़मुंबईस्थित समुपदेशन फेरीची गरज - तिडकेआयुष मंत्रालयाने राज्यातील २६ महाविद्यालयांना शेवटच्या टप्प्यात म्हणजेच आॅक्टोबर महिल्यात मान्यता दिली़ त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा संस्थास्तरावर भरण्याआधी संबंधित विभागाने मुंबईस्थित फेरीतून भरल्यास विद्यार्थ्यांना शासन सवलतींचा लाभ मिळेल, अशी माहिती गणेश तिडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आयुष मंत्रालयाच्या निर्णयाने राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होणार अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:57 AM
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या वतीने आयुर्वेदिक, होमिओपॅथीक आणि युनानीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ज्या महाविद्यालयात हे प्रवेश होणे अपेक्षित होते, अशा २६ महाविद्यालयांना प्रवेशाच्या शेवटच्या फेरीत मान्यता देऊन त्या फेरीतून उरलेल्या जागा संस्थास्तरावर वर्ग करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हजारो राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे तक्रार २६ महाविद्यालयांना आॅक्टोबरमध्ये दिली मान्यता