नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून लढणारे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे पहिल्या फेरीपासूनच आघाडी टिकवून आहे. एकूण ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून १५ व्या फेरीअखेर अंतापूरकर यांना १९१८० मतांची आघाडी मिळाली आहे. जितेश अंतापूरकर यांना ५६४०९ मते तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ३७२२९ मते मिळाली आहेत.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण १४ टेबलवर ही मोजणी ३० फेऱ्याची होईल. या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले. भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते.
देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी: पंधरावी फेरीकॉंग्रेस - जितेश रावसाहेब अंतापूरकर - ५६४०९
भाजप - सुभाष पिराजीराव साबणे - ३७२२९
वंचित- डॉ. उत्तम रामराव इंगोले - ५७९४
पंधराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८१०भाजप - सुभाष साबणे - २३७२वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३७० कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १४३८ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १९१८० मतांनी आघाडीवर आहेत.
चौदाव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४०६९भाजप - सुभाष साबणे - २५६५वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३६५कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५०५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १७७४२ मतांनी आघाडीवर आहेत.
तेराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४१८६भाजप - सुभाष साबणे - २१२३वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ५९५कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना २०६३ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १६२३८ मतांनी आघाडीवर आहेत.
बाराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८२१ भाजप - सुभाष साबणे - २२२६वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४४७कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५९५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १४१७५ मतांनी आघाडीवर आहेत.
अकराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३९३१ भाजप - सुभाष साबणे - २३२० वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४८७कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १६११ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १२५८० मतांनी आघाडीवर आहेत.