देगलूर ( नांदेड ) : जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या (deglur by-election result ) पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरु असून नवव्या फेरी अखेर कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १०, ५८३ मतांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीपासूनच अंतापूरकर हे आघाडी आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत . मात्र, काँग्रेस कडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडुन माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले हे उभे आहेत. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून असल्याचा अंदाज आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण १४ टेबलवर ही मोजणी ३० फेऱ्याची होईल. या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झाले आहे.
नवव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - 3693भाजप - सुभाष साबणे - 2612वंचित - डॉ. उत्तम इंगोले - 354
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 1081 चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण 10583 मतांनी आघाडीवर आहेत.
आठव्या फेरीतील मते:
जितेश अंतापूरकर - 3999सुभाष साबणे - 2709डॉ. उत्तम इंगोले - 381
अंतापूरकर यांना 1290 चे मताधिक्य.अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर आहेत.
सातव्या फेरीतील मते :जितेश अंतापूरकर - 3044सुभाष साबणे - 2600डॉ. उत्तम इंगोले - 449कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना सातव्या फेरीत 444 चे मताधिक्य.अंतापूरकर एकूण 8212 मतांनी आघाडीवर आहेत.
सहाव्या फेरीतील मते :जितेश अंतापूरकर - 4085सुभाष साबणे - 2487डॉ. उत्तम इंगोले - 335कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना सहाव्या फेरीत 1598 चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण 7668 मतांनी आघाडीवर आहेत.