शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्रामसेवक संवर्गातील भाडे कपाती मागे घेऊन अन्याय दूर करण्यात यावा, आशी मागणी करण्यात आली आहे. अर्धापूर पंचायत समितीच्या शिक्षकांना घरभाडे शासनाकडून आलेल्या परिपत्रकाप्रमाणे देण्यात येते, तर आमच्यावरच आन्याय का करण्यात येते आहे, आशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामसेवकातून व्यक्त केल्या जात आहेत. तालुक्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर उत्तम देशमुख, पी.एम. उराडे, एस.जी. राजेगोरे, डी.एम. लोकडे, एल.एस. केंद्रे, बी.एस. कांबळे, जे.आर. लोकडे, एस.एन. शेवाळे, ए.यू. गिते, एन.डी. घुगे, आर.व्ही. क्षीरसागर, एस.आर. बरगूलवार, आर.यू. शिंदे, डी.व्ही. शिंदे, जी.जे. आडे, एस.एस. गाढे, डी.एम. कम्पलवार, पी.एम. बेगम, व्ही.पी. शिकारे, एस.बी. पत्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रामसेवकांचे घरभाडे पूवर्वत सुरू करावे असे पत्र
जिल्हा परिषद नांदेडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्धापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना पत्र लिहून ग्रामसेवकांचे घरभाडे पूवर्वत सुरू करावे, असे पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. तर अर्धापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागले आहे.