नायगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू
नायगाव : तालुक्यात शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून, या मोहिमेअंतर्गत शहरातील पदाधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी गंगाधर बडुरे, रवींद्र भिलवंडे, माधव पाटील-कल्याण, राजेश लंगडापुरे, बाळासाहेब सर्जे, संतोष देशमुख, आदी उपस्थित होते.
लोहा येथे शांतता समितीची बैठक
लोहा : बकरी ईद हा सण या वर्षी प्रशासनाच्या सर्व सूचना व आदेशांचे पालन करीत साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले. लोहा पोलीस ठाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर १९ गावांतील मौलाना व पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कऱ्हे, सोनकांबळे, उपाध्यक्ष शरद पाटील-पवार, नगरसेवक नबी शेख, एम.आय.एम.चे निहार मंसुरी उपस्थित होते. संतोष तांबे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस पाटील वैजनाथ पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कन्हे यांनी आभार मानले.
गायकवाड यांची निवड
नायगाव : भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी सुभाष गायकवाड-उमरदरीकर यांची निवड करण्यात आली असून, खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या हस्ते शुक्रवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, अविनाश घाटे उपस्थित होते.
सिडाम यांची नियुक्ती
किनवट : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र मोघे यांच्या आदेशानुसार राज्याध्यक्ष लकी जाधव यांनी सिडाम यांना नियुक्तीपत्र दिले. निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत आहे.
शंकरराव चव्हाण जयंती साजरी
फुलवळ : फुलवळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डाॅ. शकंरराव चव्हाण जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सॅनिटाईझर, मास्क, मिनरल वाॅटर, बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा काॅंंग्रेस कमिटीचे सदस्य संजय भोसीकर, वर्षाताई भोसीकर, सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे, गंगाधर शेळगावे, प्रवीण मंगनाळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आदी उपस्थित होते.
मुदखेड येथे एकदिवसीय आरोग्य शिबिर
बारड : मुदखेड तहसील कार्यालयात एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिर झाले. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दखल घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
गजभारे यांची निवड
मारतळा : लोहा तालुक्यातील मारतळा येथील माजी सरपंच भाजपचे युवा कार्यकर्ते सुमेध नामदेव गजभारे यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या नांदेड जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी गंगाधर कावडे उपस्थित होते.
पीककर्ज मिळेना
किनवट : तालुक्यात पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. तालुक्यात यंदा खरीप हंगामात २५ कोटी २९ लाख ४६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ३९.११ टक्के आहे. प्रशासनाच्या वतीने सूचना देऊनही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.