ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 18 - जिल्ह्यातील डासमुक्त झालेल्या १२२ गावांमध्ये यावर्षी एकही डेंग्यूचा रूग्ण आढळला नाही. शोषखड्यांमुळे १२२ गावातून हद्दपार झालेला डेंग्यू शहरात मात्र आढळून आला. ग्रामीण भागात ४७, नगरपालिका क्षेत्रात १५ तर महापालिका कार्यक्षेत्रात ५१ जणांना डेंग्यूची लागण झाली.तत्कालीन जि़.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी पुढाकारातून २९ हजार ३०८ शोषखड्डे, ६ हजार ५७ गट सभा, २४ हजार ७५७ गृहभेटी व ६ हजार ५८९ कॉनर्र सभा घेण्यात आल्या़ त्यामुळे एकुण १२२ गावे डासमुक्त झाली़ यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. मात्र त्यामध्ये डासमुक्त गावांचा समावेश नव्हता़ रस्त्यावर किंवा इतरत्र साचणारे पाणी शोषखड्ड्यामुळे जमिनीत मुरू लागले़ पर्यायाने डासांची उत्पती थांबली़ या गावात एकही डेंग्यूचा रूग्ण आढळून आला नाही़. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी डेंग्यू ताप आजरापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका, घरातील पाण्याचे साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करून रिकामे करावेत़ या साठ्यातील आतील बाजू व तळ घासुन, पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
- किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत किटकजन्य आजार उदाहरणार्थ हिवताप, डेंग्यूताप, चिकुनगुन्या, जपानी मेंदूज्वर, हत्तीरोगाचा प्रादूर्भाव डासापासून होतो़ सद्या डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आहे.