चौकट- म्हणे ग्रामीण भागात फक्त ३० रुग्ण
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर जिल्ह्यात डेंग्यूचे ५९ आणि चिकुन गुन्याचे ५ रुग्ण असल्याचे नमूद आहे. त्यात मनपा हद्दीत २३, नगरपालिका हद्दीत ६ आणि ग्रामीण भागात डेंग्यूचे ३० रुग्ण आहेत. प्रत्यक्षात एकट्या विष्णुपुरी येथील रुग्णालयात आजघडीला ७० हून अधिक बालके दाखल आहेत. तर सर्वच खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. यावरून यंत्रणेचे अहवाल कसे कागदोपत्रीच आहेत हे स्पष्ट होते.
एका बेडवर तीन, तर कुठे जमिनीवर उपचार
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून बालके उपचारासाठी येतात. या ठिकाणी वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये बेडच शिल्लक नसल्यामुळे एका बेडवर तीन बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. आता तर ते जमिनीवरच उपचार घेण्याची वेळ या चिमुकल्यावर आली आहे.
श्रमपरिहार झाला तर कामाला लागा
गेले महिनाभर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पंचायत राज समितीच्या दौऱ्यात व्यस्त होती. त्यांच्या आदरातिथ्यात कुठेही कमतरता राहू नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. दोन दिवसांपूर्वी ही समिती समाधानी मनाने परत गेली; परंतु या दौऱ्याचा श्रमपरिहार अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येते.