पावसाळ्यात वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या तोटण्यात येतात. झाडांची छाटणी करताना केवळ वीजतारांना होणारा अडथळा लक्षात घेतला जातो. मात्र त्यांची नैसर्गिक रचना आणि शासकीय पद्धतीचा अवलंब छाटणीसाठी केला जात नसल्याने झाडांची नैसर्गिक रचना धाेक्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डेरेदार वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. ही झाडे कमकुवत असतात. त्यातच जर त्यांचा पर्णसांभाराचा तोल बिघडला तर झाडे लवकर काेसळतात, असे वृक्ष अभ्यासकांना वाटते.
चौकट- मालेगावराेडवरील दुतर्फा वृक्षांची उंची आता वाढली आहे. जवळपास पाच किलो मीटर अंतरावर ही झाडे लावण्यात आले आहेत. मागील सात, आठ वर्षांत ही झाडे २० ते २५ फुटापर्यंत वाढली आहेत. उन्हाळ्यात या झाडांच्या सावलीत अनेक हातगाडे व छोटे व्यापारी आपला व्यवसाय करतात. त्यामुळे मालेगावररोडवरील हे झाडे जगण्याचा आधारही ठरत आहेत. अशा वेळी पावसाळ्यात ही झाडे छाटली जात आहेत.