शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

महिला शिक्षणाधिकाऱ्यास ४ लाखांची लाच घेताना अटक

By admin | Published: April 07, 2017 2:45 PM

नांदेड जिल्हा परिषद : शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी मागितली लाच

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 7 - सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजता जिल्हा परिषदेतच अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संजय कुलकर्णी यांनी सांगितले, माध्यमिक शिक्षणाधिकारी बिरगे यांनी तक्रारदार दोन शिक्षकांचे २००६ ते २००८ या कालावधीतील भत्त्यासह वेतन ६ लाख २२ हजार तसेच सेवा खंडित काळातील वेतन ६ लाख ४९ हजार काढण्यासाठी प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ४ लाखांची लाच मागितली़ सदर तक्रारीनुसार बिरगे यांच्या साई आशिष, घर नंबर ७६, छत्रपतीनगर, पूर्णारोड, नांदेड येथे २ एप्रिल रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी कार्यवाही केली.

त्यानुसार तक्रारदार शिक्षक व त्यांच्या सहकारी शिक्षकाकडून ७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात पंचासमक्ष लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९५५ अन्वये वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय लाटकर, उपाधीक्षक संजय कुलकर्णी, उत्तम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दयानंद सरोदे, संगीता पाटील, पोहेकाँ नामदेव सोनकांबळे, सय्यद साजीद शेख चांद, श्रीमती रत्नपारखे, विलास राठोड, ताहेर खान, शेख मुजीब यांनी पार पाडली़ महिन्यात जि़.प.चे दोन अधिकारी लाच प्रकरणातकाही दिवसांपूर्वी समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती़ त्यानंतर शिक्षण विभाग एसीबीच्या कचाट्यात अडकला आहे़