हदगावमध्ये निषेध
हदगाव - बिलोली येथील घटनेचा हदगाव भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्षा भारती पाटील, सुजाता सोनुले, शांताबाई वाघमारे, मीनाक्षी पाटील, शशिकला भांडवले, उमाकांत माळोदे, पांडुरंग डोरले, सचिन शिंदे यांची नावे आहेत.
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
उमरी - येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर चहाची टपरी चालविणारा राम पिटलेवाड (वय ३२) यातरुणाला १८ डिसेंबरच्या रात्री सर्पाने दंश केला होता. त्यांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात, नंतर नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले. नांदेड येथे उपचार चालू हाेते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान २२डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ग्राहकांना प्रवेशबंदी
लोहा - येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने कोरोना काळात बंद केलेले गेट अजूनही उघडे केलेले नसल्याने ग्राहकांची बँकेच्या खिडकीवर गर्दी होत आहे. कोरोनाचे नियम पाळून ग्राहकांना प्रवेश देण्यात येवून खिडकीवर होणारी गर्दी टाळावी अशी मागणी माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे यांनी केली आहे.
अर्धापुरात आंदोलन
अर्धापूर - इंधन दरवाढीच्या विरोधात अर्धापूर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष ॲड.सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, कैलास कपाटे, शेख साबेर, अमोल कपाटे, ज्ञानेश्वर देशमुख, विनायक दवे, प्रवीण देशमुख, अनिकेत कल्याणकर, पुंडलिक कपाटे, संदीप राऊत, गोविंद कपाटे, शिवा कपाटे आदींनी सहभाग नोंदविला.
गाडगे महाराज यांना अभिवादन
धर्माबाद - मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी किरण सोनकांबळे, संतोष ठाकरे, साहेबराव सोनकांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक छाेटू पाटील बाभळीकर यांनी तर तुकाराम जाजेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला किरण सोनकांबळे, नागेश रासनगीरकर, संजय इबितवार, नरेंद्र सिंगमकर, कृष्णा जाजेवार, नागराज आरगुलवार, सचिन आरगुलवार, माधव जाधव, योगेश आरगुलवार, साहेबराव सोनकांबळे आदी उपस्थित होते.
शेकोट्या पेटल्या
किनवट - मागील चार-पाच दिवसापासून किनवट शहर व परिसरात थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिक शेकोटीचा आनंद घेत आहेत. अनेकांच्या अंगावर स्वेटर, मफलर, शाल पहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने लोक हिवाळ्याचा आनंद घेत आहेत.
रतन कराड यांना पुरस्कार
हदगाव - येथील जि.प. प्रशाळेत कार्यरत श्रीमती रतन कराड यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संदीप त्रिभुवन, सुमीत राठोड राठोड, अंकुश त्रिभुवन, दामोधर त्रिभुवन, संजय काळे, सुमनबाई त्रिभुवन, नरोद्दीन मोलाजी आदी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेत आष्टा जि.प. शाळेचे यश
आष्टा : माहूर तालुक्यातील आष्टा येथील जि.प.कें. शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.
येथील चार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. चारही उत्तीर्ण झाले. यात अविष्कार वंजो, रोहन वंजारे, प्रथमेश पिंगळे व श्रावण कुंभरे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. मुख्याध्यापक खांडेकर, बहोले, मानिककामे, वाघमारे आदींचे त्यांना मार्गदर्शन लाभले.