“अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही”; फडणवीसांचा कोल्हेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:49 PM2021-10-03T12:49:46+5:302021-10-03T12:51:33+5:30

भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

devendra fadnavis taunt amol kolhe over statement on sharad pawar pm and ajit pawar cm | “अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही”; फडणवीसांचा कोल्हेंना टोला

“अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही”; फडणवीसांचा कोल्हेंना टोला

Next
ठळक मुद्देअजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाहीया तिन्ही पक्षात समन्वय नाही, हे आधीपासून सांगत आलोयसमन्वयाच्या अभावामुळे जनतेला त्रास होतोय, त्याचे काय?

नांदेड: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांना पंतप्रधानपदी तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचे आहे, अशी मोठी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. यावरून आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला असून, स्वप्न कुणीही पाहू शकते, कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही, असे म्हटले आहे. (devendra fadnavis taunt amol kolhe over statement on sharad pawar pm and ajit pawar cm)

पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात वक्तव केले. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे गरजेचे आहे. शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, असेही अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटले होते. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टोला लगावला आहे.

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकते. या तिन्ही पक्षात समन्वय नाही, हे आधीपासून सांगत आलो आहे. त्यांच्यामधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होत आहेत. यांच्यात समन्वय नाही, इथपर्यंत ठीक आहे, पण यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेला त्रास होतोय, त्याचे काय, अशी विचारणा करत जनतेसाठी स्वप्न बघा, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 

कार्यकर्त्यांनो कामाला लागा

 शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे.  आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पाहायचे आहे. त्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवडसारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले होते. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून येथील नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार १३ ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत, तर १६ तारखेला मेळावा घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: devendra fadnavis taunt amol kolhe over statement on sharad pawar pm and ajit pawar cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.