शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By प्रसाद आर्वीकर | Published: December 12, 2023 12:57 PM

पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे.

- जयकुमार अडकिनेमाहूर: धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेड जवळ आज पहाटे साडे पाच वाजता  भीषण अपघात झाला. यात दोघे जागीच ठार तर तिघांची प्रकृर्ती गंभीर असल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहूर तालुक्यातील वाई बाजारपासून जवळच अवघ्या तिन कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सरफराजपूर ( ता. पालम जि. परभणी) येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते. तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेवून परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात घडल्याचे जखमींकडून सांगण्यात आले.

या भीषण धडकेत डिझायरच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील रमेश दत्तराव वाघमारे (५०) व लक्ष्मण पंडीत वाघमारे ( ३५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रंगनाथसंपथराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोड व बापुराव मारोती वाघमारे यांना गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आज दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या अपघातातील स्वीफ्ट डिझायर एम.एच ०२ बी.पी. ९८३६ या वाहनाने पुढे जाणा-या मोठ्या व अवजड वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीसांच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक एस.पी.नागरगोजे यांच्यासह पो.हे.काँ. दारासिंग चौहाण यांनी तातडीने हजर होवून घटनास्थळ पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने प्रकरणात अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड