सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी शिबिरात ३१७ कामगारांची तपासणी, औषधोपचार,व समुपदेशन प्रा.आ.केंद्र अर्धापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी मोरे, डॉ.सच्चिदानंद शिंदे, डॉ सुरनरे, डॉ जाधव यांनी केले. १७ बालकांचे लसीकरण करण्यात आले. ६ गरोदर मातांची रक्त तपासणी करुन त्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस, रक्तवर्धक व कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या.
कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या ११ कामगारांची अँटीजेन टेस्ट केली. सर्व कामगार निगेटिव्ह निघाले. ६० लॅब टेस्ट करण्यात आल्या. यावेळी आरोग्य सेविका श्रीमंगले, गुंडे, केदासे, आरोग्य सेवक राऊत, मेंडके यांनी लसीकरण व समुपदेशन केले. औषधनिर्माण अधिकारी शेख फय्युमोद्दीन, कांबळे यांनी औषधे वाटप केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर वैद्य, कदम, आशा, मिना, ललिता सावते, वर्षा यांनी विशेष प्रयत्न केले. गुंडिले, हुडे हे शिबिरास उपस्थित होते.