आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्रात ५७ नवे कोरोना रुग्ण सापडले. त्या पाठोपाठ ८ रुग्ण अर्धापूरचे, हिमायतनगरात १, किनवट ६, मुखेड ३, उमरी ५, नांदेड ग्रामीण १, देगलूर १, कंधार ४, लोहा ९, नायगाव १ व यवतमाळ जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन तपासणीत नांदेड मनपा हद्दीत १०१ नवे रुग्ण आढळले आहेत. अर्धापूर १, देगलूर १, कंधार १, लोहा १०, मुदखेड १, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण २, भोकर १, धर्माबाद ६, किनवट २, माहूर १, उमरी १ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ रुग्ण सापडला आहे.
रविवारी किनवटमधील अयप्पा स्वामीनगरातील ७८ वर्षीय महिलेचा विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे.? एकूण रुग्णसंख्या २४ हजार ५३८वर पोहोचली आहे.? जिल्ह्यात आजघडीला ८९९ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील २२ रुग्णांची प्रकृती अति गंभीर बनली आहे.? या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ६८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ५५, किनवट कोविड रुग्णालयात ३८, मुखेड कोविड रुग्णालयात १०, हदगाव ४, महसूल कोविड केअर सेंटरमध्ये ५८, देगलूर कोविड रुग्णालयात ४ आणि खासगी रुग्णालयात १०७ रुग्ण उपचार घेत आहेत. मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात ३३० तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात १७० रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी ११४ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून २२ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील आहेत. ८१ रुग्ण बरे झाले. विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३, देगलूर १, किनवट २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉसपीट ८, भोकर ४ आणि खासगी रुग्णालयातील १५ रुग्णांचा समावेश आहे.