शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

लिंबोटी धरणाचे 5 दरवाजे उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 4:46 PM

गुरुवारी धरणातील पाणी पातळी ही 447.42 मीटर एवढी होती आणि पाणीसाठा 73.62 दलघमी होता.

लोहा : उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणातीलपाणीसाठा गुरुवारी ( दि. 17)  97.25 टक्क्यांवर गेला. तसेच आवक सुरूच असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. यामुळे मध्यरात्री धरणाचे पाच दरवाजे उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पहाटे पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जी. कुरेकर यांनी दिली. 

गुरुवारी धरणातील पाणी पातळी ही 447.42 मीटर एवढी होती आणि पाणीसाठा 73.62 दलघमी होता. धरणावरील पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. मध्यरात्री 2 वाजता धरणाचे पाच दरवाजे 50 सेमीने उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याचा येवा थांबल्याने दि. 18 रोजी पहाटे 4 वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. 

या गावांना सतर्कतेचा इशारा पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर लोहा तालुक्यातील लिंबोटी, डोंगरगाव, चोंडी, दगडसांगवी तर कंधार तालुक्यातील उमरज, बोरी (खु), संगमवाडी, घोडज, बाळांतवाडी, शेकापूर, हणमंतवाडी, कोल्ह्याचीवाडी, इमामवाडी आदी गावांना धोका निर्माण व्होऊ शकतो. यामुळे प्रशासनाकडून या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणी