लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपा प्रवेशाची संदिग्धता कायम असून सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आ़ चिखलीकर यांच्या निवासस्थानी चहाच्या निमित्ताने एक तास बंद दाराआड चर्चा केली़ चर्चेनंतर या दोन्ही नेत्यांनी राजकीय उत्तर देत ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले़भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे हे दोन दिवसांच्या नांदेड दौºयावर आले होते़ त्यात सोमवारी सकाळी त्यांनी काही राजकीय नेत्यांच्या घरी चहा घेतला़ यात सेना आ़ चिखलीकरांच्या निवासस्थानावरील चहापान हे राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरले़ दानवे आणि चिखलीकर यांच्यात तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा झाली़ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खा़ दानवे हे रविवारी सायंकाळी नांदेडमध्ये दाखल झाले होते़ त्यांच्यासमवेत भाजपाचे महापालिका निवडणूक प्रभारी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आ़ सुजितसिंह ठाकूर यांचीही उपस्थिती होती़ रविवारी रात्री एका या दोन्हीही नेत्यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ सोमवारी सकाळी खा़ दानवे यांनी प्रथमत: माजी आ़ पोकर्णा यांच्या निवासस्थानी भेट दिली़चिखलीकरांच्या निवासस्थानी पोहोचले़ बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील उभयतांनी उघड केलाच नाही़ उलट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले़ पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी ही भेट काही राजकीय भूकंप करणारी नाही, केवळ सदिच्छा भेट आहे़ शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीने राज्यात चांगला संदेश गेला आहे़ पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून मुख्ययमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी चर्चा केली आहे़ त्यामुळे मुदतवाढ मिळेल असेही ते म्हणाले़ महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळेल असा विश्वास खा़ दानवे यांनी व्यक्त केला़ यावेळी जिल्हाध्यक्ष रामपाटील रातोळीकर, माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर, चैतन्य देशमुख, प्रवीण साले, अजय बिसेन उपस्थित होते़
दानवे, चिखलीकरांची बंद खोलीत एक तास चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:18 AM