नांदेड : नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ वाढलेला हा टक्का कुणासाठी फायद्याचा अन् कुणासाठी घातक ठरतो यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाचर्वण सुरु आहे़नांदेड लोकसभेसाठी यावेळी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण हे रिंगणात होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची करीत चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरविले़ तर वंचित बहुजन आघाडीने यशपाल भिंगे यांना उभे केले़ सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपातच लढत होईल असे चित्र होते़ परंतु नांदेडात तिरंगी लढत रंगली होती़ त्यात मतदानाचा टक्का वाढला़ यंदा नांदेड लोकसभा मतदारसंघात एक लाखांवर नवमतदार होते़ त्यामुळे या नवमतदारांचा कौल कुणाकडे जातो यावरही विजयाचे बरेच गणित अवलंबून आहे़भोकर तालुक्यात सर्वाधिक ७०़६१ एवढी विक्रमी मतदान झाले आहे़ तर सर्वात कमी मतदान मुखेडमध्ये झाले आहे़ जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारही गोंधळात पडले आहेत़ वाढलेला हा टक्का नेमका कुणाकडे यावर राजकीय चर्चांचा फड रंगत आहे़ सट्टेबाजारातही या वाढीव टक्केवारीचाच विषय रंगत आहे़सोशल मीडियावर सुरु असलेले पक्षांच्या कार्यकर्त्यांचे युद्ध मतदानानंतरही सुरुच आहे़ आपलाच नेता निवडून येणार अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत़ तर अनेकांनी विजयाचे गणित मांडून ते व्हायरल केले आहे़नांदेड लोकसभेसाठी यंदा तिरंगी सामना रंगला आहे़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे हे रिंगणात आहेत़ त्यामुळे नांदेडात होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे़ ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची झाली आहे़ तर वंचितचा हा पहिलाच प्रयत्न आहे़
वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:31 AM
नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़
ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढले मतदान १ लाख ५ हजार ८२० मतांची वाढ अनेकांची नावे होती गहाळअनेक कुटुंबांतील नावांमध्ये होत्या त्रुटी