शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:39 AM

१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणा-या योजनांचे वीजबिल थकल्याने दिवसेंदिवस बिलांचा आकडा वाढत गेला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यानंतरच लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकून चारअंकी आकड्याचे वीजबिल भरून वेळ मारून नेली जात आहे़ दरम्यान, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १३ व्या अथवा १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याची अनुमती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. तरीही गावपुढारी, ग्रामसेवक ही रक्कम भरण्यास तयार नाहीत़ त्यामुळे मार्च एण्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० गावांतील पाणीपुरवठा करणाºया योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सावरगाव (माळ) या एकाच गावाने थकित बिलांचा भरणा केला आहे. तर विद्युत बिलांच्या थकबाकीदार यादीमध्ये मनाठा, पळसवाडी, चोरंबा (खु़), वरवट, कवाना, तालंग, माळझरा, जगापूर, गायतोंड, चेंडकापूर या गावांचा समावेश आहे़ मनाठा गावाकडे ५ लाख तर उर्वरित आठ गावांकडे २५ लाख रूपयांची थकबाकी आहे.थकबाकीपोटी महावितरणने या गावांची वीज खंडित करून आठवडा उलटला तरीही कोणत्याही ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थांकडून सेवाकर वसूल करून बिल भरण्याची तसदी घेतली नाही़ प्रत्येक गावांमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, संरक्षक भिंत, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा हिशेब व बिले काढण्यातच ही मंडळी व्यस्त आहे़ दुसरीकडे सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर थकित वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय संबंधित गावांतील वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे़ त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़वीजबिल भरल्याशिवाय जोडणी नाही- वाठोरेवीजबिल भरल्याशिवाय वीजजोडणी करण्यात येणार नाही़ कोणाच्याही दबावाला हे खाते बळी पडणार नाही़ कारण आमच्या नोकरीला धोका निर्माण होत असल्याने इतरांचा विचार का करावा? थकबाकी भरा असे आवाहन अभियंता व्ही़पी़ वाठोरे यांनी केले़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेडmahavitaranमहावितरणagricultureशेती