नांदेड : महावितरणच्या शुन्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीजग्राहकांकडे सप्टेंबर 2017 अखेर पासुन असलेल्या 49 कोटी 51 लाख रुपयांच्या थकबाकी वसुली पोटी नांदेड परिमंडळातील 24 हजार 312 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला आहे.
थकबाकी वसुलीची मोहिम दि.5 फेब्रूवारी पासून हाती घेतल्यानंतर आजतागायत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयातील 24 हजार 312 घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून त्यांच्याकडे 26 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडीत करण्याच्या या कारवाईमध्ये नांदेड जिल्हयातील भोकर विभागातील 1468, देगलूर विभागातील 2061, नांदेड शहर विभागातील 5102 तर नांदेड ग्रामिण विभागातील 3263 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हयातील परभणी विभाग-एक मधील 2415 वीजग्राहक तर विभाग-दोन मधील 3216 वीजग्राहकांचा समावेश आहे. तसेच, हिंगोली जिल्हयातील 6787 वीजग्राहकांचा वीजपरवुठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला आहे.
महावितरणच्या शुन्य थकबाकी मोहिमेने आता उग्ररुप धारण केले असून कुठल्याही परिस्थितीत थकबाकी शुन्य झालीच पाहिजे या ध्येयाने वरिष्ठ अधिका-यांसह जनमित्रांपर्यंत सर्वांनीच कंबर कसली आहे. सप्टेबर 2017 अखेर नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे 49 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी आहे. नांदेड जिल्हयातील 4 लाख 24 हजार 230 वीजग्राहकांकडे 31 कोटी 56 लाख, परभणी जिल्हयातील 1 लाख 89 हजार 175 वीजग्राहकांकडे 12 कोटी 18 लाख आणि हिंगोली जिल्हयातील 1 लाख 10 हजार 388 वीज ग्राहकांकडे 5 केाटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक जिल्हयातील महावितरणच्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तहान-भूक हरवून कामाला लागले असून त्यांच्या प्रयत्नांना मोठया प्रमाणावर यशही प्राप्त होत आहे. मागील 17 दिवसात वीजग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद देत 12 कोटी 73 लाखांचा वीज बिल भरणा केला आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील 47 हजार 935 वीजग्राहकांनी 6 कोटी 81 लाख, परभणी जिल्हयातील 6 हजार 217 वीजग्राहकांनी 3 कोटी 88 लाख तर हिंगोली जिल्हयातील 10 हजार 588 वीजग्राहकांनी 2 कोटी 4 लाख रुपयांचा भरणा केला आहे.