नांदेड - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २२ हजारांकडे वाटचाल करत आहे. रविवारी नव्याने २५ रुग्ण आढळले आहेत, त्याचवेळी ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ८४१ इतकी झाली असून, रविवारी जिल्ह्यात कोरोना संशयितांचे ८४४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८१८ अहवाल निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड महानगरपालिका क्षेत्रात १४, कंधार १ आणि देगलूर तालुक्यात १ रुग्ण बाधित आढळला. ॲन्टिजेन तपासणीत महानगरपालिका क्षेत्रात ५, नायगाव १ आणि देगलूर तालुक्यात ३ रुग्ण बाधित आढळले.
जिल्ह्यात रविवारी ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये एनआरआय भवन येथून १५, विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमधून ६, देगलूर १, माहूर १, हैदराबाद येथील १ आणि खासगी रुग्णालयातील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये २२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत २५, मुखेड १९, हदगाव १, महसूल १९, देगलूर १६, हैदराबाद २, खासगी रुग्णालयात ३९ आणि गृह विलगीकरणातील १९६ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात १७० आणि जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ६३ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.