संत सेवालाल महाराज जयंती
नांदेड : दीपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका डॉ. एस. एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळकृष्ण राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रारंभी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
वुशू स्पर्धेत नांदेडचे यश
नांदेड : अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सीनियर अजिंक्यपद वुशू स्पर्धेत डॉ. प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या नांदेड जिल्हा संघातील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात सान्सू प्रकारात ७५ किलो आतील वजन गटात सुल्तान शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशू स्पर्धेत आपले स्थान निश्चत केले आहे. शुभांगी सोनकांबळे, धनश्री कासारे, कोंडिबा संबोड यांनी रौप्यपदक, तर संदेश वाघमारे यांनी कांस्यपदक पटकाविले.
रक्तदान शिबिर
नांदेड : मारोश्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदाही रक्तदान शिबिर, पोवाड्यांचा कार्यक्रम तसेच दोन हजार भगवे फेटे वाटप, अन्नधान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येथे कार्यक्रम होणार आहेत.
संत सेवालाल महाराज जयंती
नांदेड : सायन्स कॉलेजमध्ये १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बंजारा समाजाचे राेहिदास आडे यांनी संत सेवालाल यांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. अनिरुद्ध बनसोडे, प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांनी भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. एल. पी. शिंदे यांनी केले. प्रा. ई. एम. खिल्लारे यांनी आभार मानले.
नेटबाॅल स्पर्धेत नांदेडचा संघ विजयी
नांदेड : नागपूर येथे १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर नेटबॉल स्पर्धेत नांदेडच्याच नेटबाॅल मुलींच्या संघाने तृतीय क्रंमाक पटकाविला. संघात कर्णधार प्रीती लोखंडे, प्रतीक्षा सोनकांबळे, अनुष्का धनवे, राजश्री निखाते, प्रेरणा खाडे, पल्लवी जोंधळे, शहानूर शेख, विजया वैद्य, अस्मिता भेदेकर, ऋतिका अटकोरे, मोनिका नरवाडे, आदींचा समावेश होता.