नांदेड : बनावट कागदपत्रांच्या आधारे फारकत घेवून दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करणाऱ्या पतीसह अन्य पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ याप्रकरणी फसवणूक आणि विवाहितेचा छळ केल्याचे कलम लावण्यात आले आहे.
२६ मे २०१६ रोजी पिडीतेचे लग्न झाले होते़ काही दिवस सासरच्या मंडळींनी चांगले वागविल्यांनतर गेल्या दोन वर्षापासून किरकोळ कारणावरुन ते विवाहितेला त्रास देत होते़ पाहुण्यांच्या मध्यस्थीने सासरच्या मंडळींची समजूतही काढण्यात आली होती़ त्यानंतरही सासरच्या मंडळीच्या वागण्यात फरक न पडल्याने महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार करण्यात आली होती़ या ठिकाणी सासरच्या मंडळींनी चांगले वागविण्याच्या अटीवर पुन्हा घरी आणले होते़
त्यानंतर पाहुण्यांकडून विवाहितेला पतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे फारकत घेतल्याची माहिती कळाली़ तसेच विवाहितेचा पती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करीत असल्याचे त्यांना कळाले़ आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले़ या ठिकाणी पिडीतेच्या तक्रारीवरुन पती सतिष शंकरराव जाधव, सासरा- शंकरराव जाधव, सासू-पार्वती जाधव, सरस्वती जाधव, सुमन राठोड व पांडूरंग राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़