शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

'भ्रष्टाचाराची चौकशी करू नका'; अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 12:28 PM

भ्रष्टाचाराची चौकशी न करण्याच्या मागणीसाठी केले होते आंदोलन

नांदेड : ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी न करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणे ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. ही अजब मागणी करणाऱ्या ४० ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेने काढले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुखेड तालुक्यातील हंगरगा आणि गुंडोपंत दापका या दोन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. उलट या विरोधात २० नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी ग्रामसेवकांनी या दोन्ही ग्रामपंचायतीची फेरचौकशी करू नये, गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले निलंबनाचे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी असहकार आंदोलन केले होते. ग्रामसेवकांनी केलेल्या या अजब मागणीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माँटीसिंघ जहागीरदार यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. तसेच आंदोलनात सहभागी दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलनात सहभागी ४० ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

ग्रामपंचायतीची चौकशी न करणे अथवा गटविकास अधिकारी यांचे निलंबनाचे अधिकार रद्द करणे या मागण्या संयुक्तिक नसून त्या प्रशासनाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियमाचे भंग केल्याचे स्पष्ट होते, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच आंदोलनात सहभागी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे वेतन नियमानुसार कपात करण्यात यावे असेही आदेशात नमूद आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

भ्रष्टाचाराची चौकशी होणे गरजेचेमुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या विरोधात मनसेने आंदाेलन केले होते. परंतु ग्रामसेवकांनी कोणतीही चौकशी करू नये यासाठी आंदोलन केले. त्यामुळे मनसेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या दिला. त्यांनी लगेच आंदोलनाची दखल घेऊन ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत- माँटीसिंघ जहागीरदार, मनसे जिल्हाध्यक्ष.

टॅग्स :NandedनांदेडCorruptionभ्रष्टाचार