शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

बचत गटांनाच काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:04 AM

पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातल्यानंतर कापडी पिशव्याबाबत जनजागृती करावी यासाठी महापालिकेच्या वतीने वाटप करण्यात येणा-या मोफत कापडी पिशव्याचे काम महिला बचत गटामार्फतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महापालिकेला दिले आहेत.

ठळक मुद्दे नांदेड जिल्हाधिकारी यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातल्यानंतर कापडी पिशव्याबाबत जनजागृती करावी यासाठी महापालिकेच्या वतीने वाटप करण्यात येणा-या मोफत कापडी पिशव्याचे काम महिला बचत गटामार्फतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महापालिकेला दिले आहेत.पालकमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्हा नियोजन समितीमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांंतर्गत महापालिकेला मोफत कापडी पिशव्या वाटपासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला होता. जवळपास तीन महिन्यांपूर्वी हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. कापडी पिशव्यांचे हे काम बचत गटांना देण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री कदम यांनी दिले होते.मात्र महापालिकेने हा निधी प्राप्त झाल्यानंतर सदर काम बचत गटांना न देता ठेकेदारांना दिले. याबाबत स्थायी समितीने निविदा प्रक्रियेला मंजुरीही दिली. ठेकेदारांना काम देण्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री कदम यांनी या प्रकरणात जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची माहिती घेत महापालिकेला सदर काम हे स्थानिक बचत गटांकडूनच करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत.दुसरीकडे महापालिकेने सदर काम ठेकेदारांना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. केवळ कार्यारंभ आदेश देण्याची बाब शिल्लक आहे.पालकमंत्री कदम यांनी खडसावल्यानंतर महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे या प्रकरणात मार्गदर्शन मागवले. त्यावेळी हे आदेश देण्यात आले आहेत.एकूणच महापालिकेने कापडी पिशव्यांसाठी नियोजन समितीकडून प्राप्त झालेला जवळपास एक कोटी रुपयांचा निधी हा ठेकेदारांच्या हाती सोपवण्याचे सोपस्कार पूर्ण केले होते. मात्र आता जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या या आदेशानंतर महापालिका या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.---पिशवीसाठी ४३ रुपये मीटरने कापड खरेदी !महापालिकेने पर्यावरणपुरक कापडी पिशव्यांची जनजागृती करण्यासाठी मोफत वाटल्या जाणाºया कापडी पिशवीसाठी तब्बल ४३ रुपये मीटर दराने कापड खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. एकीकडे भिवंडी महापालिकेने १९ रुपये दराने कापडी पिशव्यांसाठी कापड खरेदी केली असताना नांदेड महापालिकेत मात्र जवळपास ४३ रुपये मीटर दराचा कपडा घेवून मोफत कापडी पिशव्या वाटपाचे नियोजन चालू होते. मोफत वाटपासाठी इतक्या महागाची कापड खरेदी ही बाब निश्चितच परवडणारी नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सदर पिशव्यांसाठी भिवंडी महापालिकेच्या दराने कापड खरेदी झाली पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे.---जनजागृतीचे २५ लाखांत २० फलके !शहरात प्लास्टिक बंदी आणि कापडी पिशव्या वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत. जवळपास २५ लाख रुपये या फलकासाठी खर्च केले जाणार आहेत. या फलकासाठी तीनवेळा निविदा मागवण्यात आल्या. त्यामध्ये प्रवीण कन्स्ट्रक्शन नांदेड या ठेकेदारास अंदाजपत्रकीय दरापेक्षा जवळपास १० टक्के जादा दराने काम देण्यात आले. या कामाचे आदेशही अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे जवळपास २५ लाख रुपयांच्या या प्राप्त निधीतून २० फलक बसवले जाणार आहेत. त्यामुळे एका फलकाचा खर्च हा एक लाखाहून अधिकच राहणार आहे. २३ जून रोजी राज्यात प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. महिना उलटल्यानंतर आता मनपा जनजागृती करणार आहे, हे विशेष!

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी