भोकर : देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? असा प्रश्न महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केला.गोरबंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवीगढ येथे ३ डिसेंबर रोजी नंगारा या वास्तूचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्ताने येथील संगम फंक्शन हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राज्य महसूलमंत्री संजय राठोड बोलत होते. यावेळी मंचावर गोरबंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजुसिंग नाईक, रोहिदास जाधव, केशवराव चव्हाण, डॉ. बी.डी. चव्हाण, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, आप्पाराव राठोड, डॉ. यु. एल. जाधव, विनोद चव्हाण, सुभाष किन्हाळकर, डॉ. राम नाईक यांची उपस्थिती होती.समाजाच्या विकासाकरिता असलेले वसंतराव नाईक महामंडळ बंद का ? असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या धोरणाबाबत राठोड यांनी नाराजी व्यक्त करुन पक्ष, राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नासाठी संघटीत झाले पाहिजे. यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष रोहिदास जाधव, डॉ. बी.डी. चव्हाण, शेषेराव चव्हाण यांनी विचार व्यक्त करुन पोहरादेवी येथे हजर होण्याचे आवाहन केले. सभेला विविध पक्षातील गोरबंजारा समाजातील पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती हे विशेष. प्रास्ताविक डॉ. यु.एल. जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. गणेश जाधव यांनी केले.
आरक्षण धोरणात गोरबंजारा समाजाचा भेदभाव का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:50 AM
देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? असा प्रश्न महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केला.
ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा सवाल