दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८० ते ८५ रेल्वेगाड्या नियमितपणे धावत आहेत. परंतु, त्या सर्व विशेष आणि एक्स्प्रेस गाड्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना प्रवेश कठीण झाले असून, आरक्षणाशिवाय कधी प्रवास करता येणार, तसेच पॅसेंजर गाड्या नांदेडसह सर्वच विभागातून कधी धावणार, असा प्रश्न सामान्य प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
आरक्षण मिळेना
नांदेड येथून मुंबईकडे धावणाऱ्या तसेच नांदेड ते तिरूपती मार्गावरील गाड्यांना काही दिवसांची वेटिंग आहे. त्यात मुंबईचे तत्काळमध्ये देखील आरक्षित तिकीट उपलब्ध हाेत नसल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. आरक्षित गाड्यांबरोबर पॅसेंजर गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
नांदेड येथून परराज्यात प्रवास करण्यासाठी कोरोना टेस्ट अथवा लसीकरण केलेच पाहिजे, असे काही नाही. परंतु, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधील काही प्रमुख स्थानकांवर उतरायचे असेल तर कोरोना अहवाल असणे आवश्यक आहे. नसेल तर त्या त्या स्थानकात कोरोना चाचणी करूनच शहरात प्रवेश करू दिला जातो.
पॅसेंजर कधी सुरू होणार?
n नांदेड विभागातून आजघडीला सर्व एक्स्प्रेस गाड्याच सुरू आहेत. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहे.
n ग्रामीण भागातील प्रवाशांना गाड्या उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
n नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी संघटना करत आहेत.