कधी आपल्याला लॉटरी लागल्याचे सांगून तर कधी आपली एखाद्या योजनेसाठी निवड झाल्याचे सांगून बँक खात्यासह संपूर्ण माहिती घेतली जाते. परंतु अशी माहिती देणे बँक खाते रिकामे करणारे ठरू शकते. त्याचवेळी एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला कॉल करायचा आहे किंवा इतर काही कारणे सांगून मोबाइल मागतो. अशावेळी त्या व्यक्तीकडे थोडेही दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. मोबाइलवरील क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या साहाय्याने तो आपले खाते रिकामे करू शकतो.
ही घ्या काळजी
आपला मोबाइल अनोळखी व्यक्तीला देऊ नये. दिला तरी तो आपल्या मोबाइलवरून नेमके काय करीत आहे याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.
खबरदारी घ्या
मोबाइलद्वारे अनेकांना गंडविले जात आहे. सोशल मीडिया तसेच लिंकच्या माध्यमातूनही बँकेतील रक्कम काढल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मोबाइलचा गैरवापर कोणी करणार नाही, याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- राजेश आलेवार
सहायक पोलीस निरीक्षक