चाैकट- मुुंबई, दिल्लीची गर्दी ओसरली
मागील वर्षी सलग पाच, सहा महिने देशभर लॉकडाऊन होते. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प होती. पहिली लाट थोड्या प्रमाणात ओसरल्यानंतर काही रेल्वेगाड्या सुरू झाल्या होत्या. दसरा, दिवाळीला जवळपास सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या होत्या. कोरोनाचे संकट टळल्याचे आशादायी चित्र निर्माण झाल्यानंतर प्रवाशी संख्या ही वाढली होती. मात्र यावर्षी ऐन उन्हाळाच्या सुरुवातीस पुन्हा कोरोनाचे संकट अधिक बळकट होऊन समोर उभे राहिले. त्यामुळे दळणवळणावर परिणाम झाला. ही दुसरी लाट अधिक भयंकर असल्याने नागरिक घराबाहेर निघत नाहीत. त्यामुळे एरव्ही मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची हाऊसफुल्ल गर्दी आता ओसरली आहे.
चौकट-
विशेष रेल्वेलाही गर्दी कमीच
जिल्ह्यातून आता ८० रेल्वेगाड्या धावत असून यापूर्वी ही संख्या दीडशेहून अधिक होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रेल्वेगाड्यांची संख्या निम्यावर आली आहे. प्रवासी आपले नियोजित दौरे रद्द करत आहेत. ज्यांनी तिकिटे बुक केली होती. ते आता आरक्षण रद्द करत आहेत.