नांदेड : आज घडीला राज्यात शिक्षणापेक्षा दारू दुकाने खुप महत्वाचे बनले आहेत, त्यात ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस डिग्री मिळणार असेल तर त्या ऐवजी मला देशी दारू दुकानाचा परवाना द्या, अशी धक्कादायक मागणी पवन जगडमवार या विद्यार्थ्यांने आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांचा कसलाही विचार न करता ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन क्लासला एका वर्गात ४० विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी लेक्चर करत आहेत.बाकीच्या अनेक विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाईल नाहीत,ग्रामीण भागात इंटरनेट सेवा सुरळीत चालत नाही तर कधी लाईटच राहत नाही मग अशा परिस्थितीत हे गोरगरीब विद्यार्थी शिक्षण कसे घेतील याचा विचार का ? करत नाही असा सवाल पवन जगडमवार या विद्यार्थ्यांने केला आहे.ऑनलाइन शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणा पासून वचिंत तर राहत आहेत पण यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोरोना , ओमिक्रान चा प्रसार वाढत आहे म्हणून राज्यातील शाळा , काॅलेज , विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र खुल्लेआम चालू ठेवून दारूच्या दुकानात होत असलेली गर्दी चालते पण कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणा पेक्षा देशी दारूचा परवाना मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांने केली.
राज्यात शिक्षणा पेक्षा दारू ला जास्त महत्वाचे स्थान प्राप्त झाले.ऑनलाइन शिक्षण शिकून तरी काय फायदा ज्यात प्रॅक्टिकल ज्ञान काहीच येत नाही उद्या या डिग्रीवर नोकरी साठी गेले तर कोणी नोकरी पण देणार नाही. मग मला अशी बोगस डिग्री देण्यापेक्षा देशी दारू दुकनाचा परवाना देऊन सहकार्य करा मी दारूचा व्यवसाय करून कधीच उपाशी मरू शकणार नाही सर्व नियमाचे पालन करून दारूचा व्यवसाय करेल योग्य दरातच त्याची विक्री करेल निवडणूकीच्या काळात व बंद भारीत ज्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते त्याचा मी दुरउपयोग कधीच करणार नाही तुम्हच्या निवडणूकीच्या काळात दारू खुप कामी येईल मी होईल तेवढे तुमच्या राजकारणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करेल या मागणीचा व माझ्या गरीब परिस्थितीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मला देशी दारू दुकानाचा परवाना द्या अशी मागणी पवन जगडमवार या विद्यार्थ्यांने मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.