शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 6:52 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

- मारोती चिलपिपरे कंधार (नांदेड) : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गुरुवारी रात्री घडली. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. जेथे घटना घडली त्या कंधारमध्ये तर आज दुपारी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहरातील भीमगड येथून कंधार पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा धडकला. यावेळी हाके म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातोय. ओबीसी समाजातील व्यक्ती विधानसभेला उभे राहिलेले यांना आवडत नाही, आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? आम्ही निवडणुकीला उभं रहायचं नाही का? असा सवाल यावेळी हाके आणि उमेदवार चंद्रसेन पाटील यांनी केला. 

काय घडले गुरुवारी रात्री लोहा विधानसभा उमेदवार म्हणून चंद्रसेन सुरनर निवडणुक लढवित आहे. त्यानिमित्ताने ७ रोजी कौठा येथे प्रचारसभेसाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे गुरुवारी रात्री येत असताना साडेआठच्या सुमारास बाचोटी येथे १०० ते १५० जणांनी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील यांचा विजय असो, प्रा. लक्ष्मण हाके यांचा निषेध अशा घोषणा देत रस्ता अडवला. यावेळी उमेदवार चंद्रसेन सुरनर, माधव मुसळे, उत्तमराव चव्हाण आदींची वाहने देखील अडविण्यात आले. अचानक काही जण हाके यांच्या गाडीच्या बोनेटवर चढले. तर काहींनी दगडफेक करत हाके यांच्या कारचा (एएच ५० एल ३४५) मागील काच फोडली.

हल्ला करणारे १० जण अटकेतयाप्रकरणी कंधार पोलिसांनी ८ रोजी फिर्यादी विकास भगवान कोकाटे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी रघुनाथ हनुमंता धोंडगे, रमेश केशवराव धोंडगे, शिवशंकर मारोतराव धोंडगे, दत्ता गोविंदराव वरपडे, यादव जगन्नाथ वरपडे, दत्ता रामजी धोंडगे, बालाजी रघुनाथ वरपडे, सचिन शिवाजी दूरपडे, हनुमंत शिवाजी दूरपडे, शिवशंकर बळीराम धोंडगे या १० आरोपी ताब्यात घेतले असून व इतर १५ ते २० आंदोलक सर्व रा. बाचोटी येथील असून अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले हे करीत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकloha-acलोहाlaxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षण