शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले समाजशास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.

ठळक मुद्देविद्यापीठात व्याख्यान राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले हे होते. तर कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती विश्लेषण’ या विषयावर बोलताना प्रा. कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी वेचले. भारताच्या विकासासाठी झटले. भारतातील जातीव्यवस्था हा विकासातला मोठा अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच, प्रत्यक्ष व्यवहारातून जात निघून जाण्यासाठी त्यांनी कार्य केले. जातीकडे त्यांनी कूट प्रश्न म्हणून पाहिले. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते जाती व्यवस्थेचे मूल्यांकन करु शकले. कारण जात ही आपसूकपणे आपली स्व:ची व्यवस्था निर्माण करत असते. असमानतेवर आधारित असलेली जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून त्यांनी मोठे कार्य केले.प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी तर डॉ. गजानन झोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. राम जाधव, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ.वीरा राठोड, डॉ योगिनी सातारकर, विश्वाधार देशमुख, उद्धव हंबर्डे, डॉ. भीमराव हटकर, सुनील ढाले, माधव जायभाये, संदीप एडके, विनायक येवले आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थी