तसेच विद्युत भवन परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पुतळ्याच्या पाठीमागील भिंतीवर कलाकृती शिल्प साकारण्यात येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय मातंग संघाच्या वतीने १ मेपूर्वी पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्ष भारत खडसे यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. यासाठी त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, महापालिकेने खडसे यांना पत्र देऊन सुशोभिकरण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी चांदुजी एडके, सुनील जाधव, विश्वांभर हनवंते, यादव खडसे, अविनाश खडसे, खंडेश्वर लिंगायत, कोंडिबा आठवले, गंगाधर वाघमारे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:28 AM