कंधार तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीची जुलै ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आरक्षणाची सोडत यापूर्वीच झाली आहे येत्या काही दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार आहे. २५ सप्टेंबर २०२० रोजी विधानसभेच्या प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी नुसार प्रारुप प्रभाग निहाय मतदार यादी निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे या संबंधित अक्षेप १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तहसीलदार कंधार यांच्याकडे नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
९८ ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर याद्या लावण्यात आल्या आहेत या ग्रामपंचायती ९८ सरपंच व त्या ग्रामपंचायतीमधून ८५० सदस्य निवडले जाणार आहेत. तालुक्यातील बारूळ, औराळ, चिखली, हळदा, कवठा, काटकळंबा, नंदनवन रहाटी, चिंचोली, धर्मापुरी, बाचोटी, पेठवडज, तेलुर, वरवंट, दहिकळंबा आलेगाव, लाठी, उस्माननगर, शिराढोण, दाताळा यासह आधी गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
पुढारी लागले कामाला...
बारूळ व पेठवडज परिसरातील चाळीस गावात पुढारी निवडणुकीचा कार्यक्रम जसा जसा जवळ येत आहे तसाच तसा या परिसरातील वातावरण तापत आहे. बारूळ येथे एस सी पुरुष सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून जो तो आपल्या सरपंच पदाचा दावेदार म्हणत आहे येथे नवयुवक सरपंच पदाचे दावेदार करीत आहेत. परंतु पॅनल प्रमुख कुणाला शिव करणार यावर सुद्धा अवलंबून आहे. राहटी ग्रामपंचायत ओबीसी सुटले असून गावात एकच ओबीसीचे घर असल्यामुळे कोणाकडून उभारावे हा प्रश्न संबंधितावर पडला आहे. औराळ नंदनवन काटकळंबा या ठिकाणचे ही वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे सरपंच पदाचे दावेदार व पॅनल प्रमुख मतदारात आता माय बाप म्हणून फिरताहेत असे चित्र दिसत आहे