नांदेड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी जिल्हा परिषद परिसरातील बंद पडलेले शुद्ध पाण्याचे आरो फिल्टर दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. वाहन चालक संघटनेच्या वतीने जि. प. अध्यक्षा अंबुलगेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. ३ मे रोजी जिल्हा परिषद परिसरातील पाणी फिल्टर दुरुस्ती करून चालू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद परिसरात खाजगी वाहन चालक व गोरगरीब जनता, इतर कर्मचारी व जिल्हा परिषदेमध्ये येणारे अभ्यंगत मोठ्या प्रमाणावर येतात. त्या सर्वांना शुद्ध पिण्याचे मिनरल वाॅटर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अंबेकर, संजय राऊत, किरण वैद्य, माणिक भासिंगे, संभाजी देवणे, गोंविद गिरी, शेख आफसर , गजानन जाधव, बालाजी पाटील, सुजित सूर्यवशी उपस्थित होते.
जिल्हा परिषद परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:18 AM