लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाकडून सुमारे सातशे गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवाना घेवून गणेशाची स्थापना केली आहे. तर परवाना न घेता स्थापना करणा-या मंडळांची संख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. या मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानेही पुढाकार घेतला असून, मिरवणूकीतील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेतली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. यात नागरिकांचे देखील त्यात सहकार्य व सहभाग अपेक्षित आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत विघ्नसंतोषी किंवा समाजकंटकावर नजर रहावी, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय आता शहरात ड्रोन कॅमे-याची देखील नजर राहणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आणि त्याला जोडले जाणारे रस्ते, गल्ली, बोळ यांच्यातील नागरिकांवर या कॅमे-याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात करण्याचे नियोजन आहे. श्रीचे आगमन व त्यानंतर होणाºया वेगवेगळ्या कार्यक्रमात पोलिसांची चोखबंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी होणा-या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.देखाव्यासाठी गर्दीशहरात गणेश मंडळातर्फे आकर्षक देखावे उभारण्यात आले आहेत़ त्यातच गुरुवारी शासकीय सुट्टी आल्याने गणेश भक्तांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते़ गणेश विसर्जनासाठी अवघे काही दिवस राहिल्याने यापुढील दिवसातही देखावे पाहण्यासाठी गर्दी कायम राहणार आहे़
नांदेडमध्ये मिरवणुकीवर राहणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:12 AM