शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

हमाल मापडांच्या आंदोलनामुळे भोकरची बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:31 AM

येथील बाजार समिती अंतर्गत काम करणाºया हमाल- मापाडी मजुरांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प पडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : येथील बाजार समिती अंतर्गत काम करणाºया हमाल- मापाडी मजुरांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प पडली होती.बाजार समितीच्या मोंढा येथील २५० हमाल- मापाडी काम करतात. या कामगारांना देण्यात येणारे मजुरीचे दर सन २००८ पासून वाढविण्यात आले नाहीत. यामुळे अल्पदरात काम करावे लागत असल्याने वेळोवेळी दर वाढवून देण्याची मागणी करुनही दरवाढ होत नव्हती. अखेर कामबंद आंदोलन करुन मजूरदारांनी मोंढा मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, २७ रोजी बाजार समितीत संबंधितांची बैठक घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र बाजार समितीचे सचिव यांनी दिल्याने दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनास उपसभापती गणेश राठोड, संचालक जाकेरखाँ पठाण, सतीश देशमुख, सुनील चव्हाण, आप्पाराव राठोड, देवानंद धूत यांनी भेट दिली.आंदोलनात भोकर हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष सुरेश करंडेकर, उपाध्यक्ष उत्तम जाधव, सचिव अनिल जाधव, महाराष्ट्र जनकल्याण कामगार महासंघाचे अध्यक्ष रामधन राठोड, दत्तात्रय वानखेडे, संतोष जाधव, नरसिंग डोईफोडे, विठ्ठल माचनवाड, बाबूराव नामेवाड, महानंदा कांबळे, गंगाबाई घुले आदी सहभागी झाले होते.महिला मजुरांची व्यापाºयांकडून पिळवणूकबाजार याडार्तील व्यापाºयांकडून महिला मजुरांची पिळवणूक होत असल्याची तक्रार महिला मजुरांनी केली. त्या म्हणाल्या की, येथील व्यापारी हमाल-मापाडी महिला मजुरांना कामाचा मोबदला न देता आपल्या प्रतिष्ठानातील व घरगुती कामे मोबदला न देता करुन घेतात. रात्री उशिरापर्यंत मुकाट्याने काम करावे लागते़ तसेच त्याच्याकडे आलेल्या शेतीमालाची राखण करण्याची जबाबदारी महिलांवर सोपवित असल्याने रात्रीला पहारा देण्याचे काम करावे लागते.