लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे़ ११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असल्याने व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेल्याने तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी चांगला पाऊस पडला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपाची पेरणी केली़ नंतर मात्र पावसाने उघडीप दिली़पुढे पुढे पावसाने दगाच दिला अन् हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेल्यात जमा आहे़ जून महिन्यात सतरा दिवस, जुलै महिन्यात वीस दिवस, आॅगस्ट महिन्यात चोवीस दिवस व सप्टेंबर महिन्यात केवळ आठ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जून महिन्यात सतरा दिवसांत दहावेळा एक अंकी व सातवेळा दोन अंकी, जुलै महिन्यात तेरावेळा एक अंकी व सातवेळा, आॅगस्ट महिन्यात एकोणवीस वेळा एक अंकी तर केवळ पाचवेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़ सप्टेंबर महिन्यात आठवेळा पाऊस पडला़ त्यात सातवेळा एक संकी तर एक वेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले़ प्रकल्प भरले मात्र बहुतांश प्रकल्प गाळात रुतलेले़ त्यामुळे जसजसे ऊन तापेल तसतसे नदी-नाले कोरडे पडतील़ प्रकल्प आटतील असेच चित्र राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे टाकणार आहे़ तर खरिपाचा उताराही घटणार असल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ शासनाने किनवट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे़ तशी मागणी आ़ प्रदीप नाईक यांनी लावून धरली. झालेला पाऊस याप्रमाणे - महिना झालेला पाऊस, पडावयाचा पाऊस या प्रमाणे जून १५१ (१७८), जुलै २२८ (३५७), आॅगस्ट ३६४ (३२२), सप्टेंबर ३६ (२२९) असा आहे़किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली.११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़