नांदेड : सेनेचे आमदार असताना मनपा निवडणुकीत शिवसेनेवर तिखट शब्दांचे बाण चालविणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकर यांना युतीने उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यांच्या उमेदवारीमुळे सेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता़ त्यात आता चिखलीकरांनी सेनेतीलच काही जणांना हाताशी धरले असून त्यामुळे शिवसेनेत खदखद कायम आहे़ नाराज सेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेवून गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे़सेनेच्या आमदारकीचा राजीनामा न देता प्रताप पाटील चिखलीकर यांनी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती़ यावेळी चिखलीकरांनी सेनेत राहूनच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी फोडले़ खुद्द सेनेचा जिल्हाप्रमुखही चिखलीकरांनी पळविला़ तेव्हापासून नांदेडात चिखलीकर आणि सेना पदाधिकाºयांमध्ये तीव्र संघर्षास सुरुवात झाली होती़शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोलही बडविले होते़ परंतु त्यानंतरही चिखलीकरांनी सेना पदाधिकाºयांची दखलच घेतली नाही़ त्यात आता चिखलीकरांना सेना-भाजप युतीने नांदेडची उमेदवारी दिली़ या उमेदवारीमुळे सेना पदाधिकाºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता़उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच सेना पदाधिकाºयांनी आपल्याला विश्वासात घेण्याची मागणी केली होती़ परंतु, पक्षनेतृत्वानेही सेना पदाधिकाºयांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे नाराज झालेल्या सेना पदाधिकाºयांनी बुधवारी वजिराबाद भागात बैठक घेवून आपल्या भावना व्यक्त केल्या़ पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यानंतर शिवसैनिक चिखलीकरांच्या प्रचारासाठी तयार झाले होते़ परंतु, चिखलीकरांनी सेनेमध्ये फुट पाडण्याचे धोरण सुरुच ठेवल्याचा आरोप करीत सेनेतील काही जणांना त्यांनी हाताशी धरले आहे़चिखलीकरांनी सेना पदाधिकाºयांना विश्वासात घेतले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही सेनेच्या पदाधिकाºयांनी दिला़ बुधवारी झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, संघटक दयाल गिरी, उपजिल्हाप्रमुख प्रदीप जाधव, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख तुलजेश यादव, निवृत्ती जिंकलवाड, मुन्ना राठोड, गणेश हरकरे, नंदू वैद्य, जितूसिंघ टाक, सुनील जाधव, अर्जुन ठाकूर व बल्ली राओत्रे यांच्यासह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती़ दरम्यान, शिवसेनेत सुरु असलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांत गोंधळाचे वातावरण आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात, याकडेही जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, शिवसेनेत सुरु असलेल्या या नाराजीबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.आ़साबणे चिखलीकर यांच्या व्यासपीठावरशिवसेनेच्या इतर पदाधिकाºयांनी चिखलीकरांच्या कार्यक्रमाला पाठ फिरविली आहे़ असे असताना आ़सुभाष साबणे मात्र प्रत्येकवेळी चिखलीकर यांच्यासोबत होते़ तसेच माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील हेही चिखलीकरांच्या प्रचारात आहेत़ काही दिवसांपूर्वीच आ़साबणे यांच्या निवासस्थानी चिखलीकर समर्थनार्थ बैठक बोलाविण्यात आली होती़ त्या बैठकीला पदाधिकारी अनुपस्थित होते़
चिखलीकरांमुळे सेना फुटीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:27 AM
सेनेचे आमदार असताना मनपा निवडणुकीत शिवसेनेवर तिखट शब्दांचे बाण चालविणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकर यांना युतीने उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यांच्या उमेदवारीमुळे सेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता़ त्यात आता चिखलीकरांनी सेनेतीलच काही जणांना हाताशी धरले असून
ठळक मुद्देनाराज सैनिकांची बैठक विश्वासात न घेतल्यास गंभीर परिणाम होण्याचा दिला इशारा