कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून योग व प्राणायम करणे लाभदायक ठरू शकते, असे योग प्रशिक्षक सांगत आहेत.
चाैकट- नियमित प्राणायम केल्याचे फायदे
-प्राणायाम करणारी व्यक्ती ब्रह्मचर्याचे पालन करू शकते. सरावाने आध्यात्मिक शक्ती वाढते. आत्मिक आनंद मिळतो.
- स्मरशक्ती वाढते, मनशांती लाभते, दीर्घायुष्य प्राप्त होते. आत्मिक साक्षात्कार होतो. शरीर निरोगी व सृद्दढ राहते.
- अकारण वाढलेली चरबी किंवा मेद घटतो. ज्ञानतंतु अत्यंत कार्यक्षम होतात. नाड्या शुद्ध होतात. मनातील विकृती जाते. जठराग्नी प्रदीप्त होतो. मनाची एकाग्रता वाढते.
- शरीराची सुस्ती जाते तसेच नियमित प्राणायम केल्यामुळे पोट, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे यांची कार्यक्षमता वाढते. पचनक्रिया सुधारते.
चौकट- प्राणायत तज्ञ म्हणतात
१. कोरोनाच नव्हे तर सर्वच आजारावर मात करण्यासाठी योगासन, प्राणायम गरजेचा आहे. या काळात श्वसनाचे विकार होऊ नये, यासाठी प्राणायम अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशिक्षकांकडून योगा व प्राणायम शिकले पाहिजे.
- नागोराव पोलादवार, अध्यक्ष, योग विद्या धाम नांदेड
२. कोरोनामुळे माणसे अतिसंकटात सापडला आहे. या आजारावर मात करण्यासाठी प्राणायम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व मानसिक, भावनिक तणाव कमी करण्यासाठी प्राणायमाची मदत होते.
- मधुकर नल्लावार, सचिव, योग विद्या धाम, नांदेड
चाैकट-
१. नियमित प्राणायम केल्यामुळे कोणताही आजार हाेत नाही. विशेषता कोरोना काळात प्राणायमाचे महत्व अधिक कळले असल्याने अनेकजण त्याकडे वळले आहेत. शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी प्राणायमचा खरोखरच चांगला फायदा झाला.
- गणेश शिंगणे, नांदेड