लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शन तिकिटासाठी नांदेडातील डाक कार्यालयात ई-सुविधा मागील डिसेंबरपासून सुरु होती़ ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे़ याबाबत न्यायालयात वाद सुरु होता़ तिरुपती देवस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती़सिडको भागातील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने तिरुमला तिरुपती देवस्थानकडून ई-सुविधेवर दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा करार करण्यात आला होता़ परंतु त्यानंतर ई-सुविधेसाठी इच्छुकांची संख्या वाढली़ त्यानंतर सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानने न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता़ आमच्याव्यतिरिक्त कोणालाही हे ई-सुविधा केंद्र देता येणार नाही असे त्यात म्हटले होते़ न्यायालयानेही त्यांचे म्हणणे मान्य केले होते़ नांदेडच्या ८० किलोमीटर परिसरात कोणालाही तिरुमला तिरुपती देवस्थानने ई-सुविधा केंद्र देऊ नये असे आदेश दिले होते़ परंतु तिरुमला देवस्थानने डाक कार्यालयाच्या माध्यमातून हे ई-सुविधा केंद्र अनेक ठिकाणी सुरु केले होते़नांदेड डाक कार्यालयातील ई-सुविधा केंद्र डिसेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आले होते़ यासंदर्भात सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानने अॅड़समीर पाटील यांच्या वतीने अवमान याचिका दाखल केली़ त्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानला नोटीस पाठविण्यात आली होती़नोटीस मिळताच डाक कार्यालयातील ई-सुविधा केंद्र बंद करण्यात आली़ त्यामुळे तिरुपती दर्शनासाठी जाणाºया भाविकांना आता डाक कार्यालयातून तिकीट मिळणार नाहीत़ ही ई-सेवा सुरु करण्याचा अधिकार आम्हालाच असल्याचे सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानचे म्हणणे आहे़दरम्यान, डाक कार्यालयात तिरुपती देवस्थानचे दर्शन पास व इतर पास मिळत असल्यामुळे नांदेडकरांची मोठी सोय झाली होती़ त्याला प्रतिसादही मिळत होता़
तिरुपती देवस्थानची नांदेड डाक कार्यालयातील ई-सुविधा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:36 AM
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शन तिकिटासाठी नांदेडातील डाक कार्यालयात ई-सुविधा मागील डिसेंबरपासून सुरु होती़ ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे़ याबाबत न्यायालयात वाद सुरु होता़ तिरुपती देवस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती़
ठळक मुद्देवाद न्यायालयात : भाविकांची होणार गैरसोय