आरळी : उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत शुक्रवारी आरळी येथे जिल्हा परिषद गटस्तरीय महिला बचत गट प्रभाग संघाची स्थापना व प्रशिक्षण उत्साहात पार पडले. यावेळी महिला बचत गट प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
आरळी हे जिल्हा परिषद गटाचे गाव असून, येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आरळी जिल्हा परिषद गटस्तरीय विराट शक्ती महिला बचत गट प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आरळी गटस्तरीय महिला बचत गट प्रभागसंघाच्या अध्यक्षपदी सोन्याबाई उमेश गायकवाड, सचिवपदी मीराबाई रमेश बाळके, कोषाध्यक्षपदी महानंदा दत्ताहारी खैरगावे, तर लिपिकपदी लक्ष्मी शिवराज शेटकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचे गागलेगावचे सरपंच राजेश्वर पाटील यांच्या वतीने, जयश्री पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गट प्रशिक्षक तथा तालुका व्यवस्थापक तुकेश कुंभार व सचिन कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण उत्साहात पार पडले.