चौकट...
सुटकेचा नि:श्वास...
कोरोनामुळे नीटच्या तारखेत बदल झाले. त्यामुळे परीक्षा वेळेवर होईल की नाही, याची शाश्वती नव्हती. परंतु, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही. त्यामुळे देशभरात रविवारी ठरल्याप्रमाणे नीट परीक्षा संपन्न झाली. परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हुश्श... एकदाची परीक्षा झाली... अशा प्रकारे सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे भाव पाहायला मिळाले.
वाहतूक शाखेने नियोजन
शहरात वाहतूककोंडी होऊन विद्यार्थ्यांना परीक्षेस जाण्यास विलंब होऊ नये, या दृष्टीने वाहतूक शाखेने रविवारी नियोजन केल्याचे दिसून आले. यशवंत महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज, ऑक्सफर्ड स्कूल, आदर्श स्कूल आदी परीक्षा केंद्राच्या मुख्य चौक, रस्त्यावर तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर परीक्षा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर परीक्षेच्या वेळेपूर्वी वाहतूक पोलिसांनी खडा पहारा देत वाहतूक सुरळीत ठेवली.