लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/उस्माननगर : उस्माननगर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.उस्माननगर (ता. कंधार) शिवारात कापूस लागवड केलेले शेतकरी पावसाची उघडीप झाल्यामुळे वखरणी करण्यात गुंतले आहेत. अशोक गोविंदराव काळम या शेतकºयाच्या शेतात वखरताना एक नाणे आढळले. त्यामुळे शेतकºयाने त्या नाण्याकडे कुतुहलाने पाहत त्याला आपल्या हातात घेतले. या नाण्यावर एका बाजूला फारशी भाषेचा उल्लेख आहे. तसेच इंग्लंडचा राजा विलियम (चौथा) याची प्रतिमा आहे. योगायोग म्हणजे निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर हा निजामाचा चौथा राजा होता. त्याचा कालखंड १८२९ ते १८५७ असा आहे. त्यामुळे या काळात अनेक नाणी प्रचलित होती. हे अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले.निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर यांचे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. या राजाच्या काळात चंदूलाल राजा, राजाराम बक्ष व सालारजंग (पहिले) हे तीन दिवाण होते. सालारजंग (पहिले) यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पामर कंपनी, सावकार, ब्रिटिश सरकार यांच्याकडून कर्ज घेतल्यामुळे हे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन गेले. त्यामुळे राज्य निजामाचे आणि हुकूम ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा, असा कारभार या काळात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या तंत्राने निजाम (चौथा) याचा कारभार सुरु असल्या कारणाने हे चलन मोठ्या प्रमाणात या भागात वापरात होते.मराठवाडा निजाम राजवटीत असल्यामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले. हे चलन ईस्ट इंडिया कंपनीचे व इंग्लंडचा राजा मिलियन (चौथा) यांची प्रतिमा असलेले आहे, असे श्री शिवाजी कॉलेज कंधारचे डॉ. अनिल कठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
---मराठवाडा निजाम राजवटीत असल्याचे कारणमराठवाडा निजाम राजवटीत असल्याच्या कारणामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले.