यशवंत वार्षिक ऑनलाइन युवक महोत्सव :२०२१ उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
या प्रसंगी उद्घाटक डॉ. विवेक सावंत, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, समन्वयक प्रा.डॉ. महेश कळंबकर, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक डॉ. विवेक सावंत यांनी, आज तरुणांना यशस्वी होण्याकरिता ८५% सॉफ्ट स्किल्स व १५ टक्के हार्डस्किलची गरज आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करिअरच्या संधी प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे म्हणाले की, यशवंत महाविद्यालयाने युवक महोत्सवाचा नवीन पॅटर्न गतवर्षीपासून सुरू केलेला आहे. गतवर्षी संशोधन पेपर सादरीकरणाकरिता मानव्यविद्या व वाणिज्य शाखेकरिता भारतीय अर्थव्यवस्था हा विषय, विज्ञान शाखेकरिता ग्लोबल वॉर्मिंग हा विषय होता. तसेच पोस्टर सादरीकरण व मॉडेल सादरीकरणही संपन्न झाले. प्रत्येक शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य वाव मिळवून देण्याकरिता प्लॅटफॉर्म निर्माण करणे गरजेचे आहे.
महोत्सवाचे समन्वयक प्रा.डॉ. महेश कळंबकर यांनी, २२ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा.डॉ. अजय गव्हाणे यांनी करून दिला. तर, आभार प्रा.डॉ. एल.व्ही. पद्मा राव यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा.डॉ. एम.एम. व्ही.बेग, प्रा.डॉ. संजय नन्नवरे, प्रा. गौतम दुथडे, प्रा.डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रा.डॉ. व्ही.सी. बोरकर, प्रा.डॉ. संगीता चाटी, प्रा.डॉ. पी.बी. पाठक, प्रा.डॉ. श्रीकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले.