लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहर व परिसरात शनिवारी ईद-उल- फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची मुख्य नमाज जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागातील ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी लाखो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुख्य नमाजनंतर खा. अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.ईद-उल- फित्र शनिवारी साजरी होणार असल्याची घोषणा शुक्रवारी झाली होती. परिणामी शुक्रवार सायंकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. शहरात पहाटेपर्यंत खरेदी सुरुच होती. शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर, बर्की चौक या भागात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शनिवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लिम बांधव ईदगाह मैदानाकडे जात होते. लाखो बांधवांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मुख्य नमाज अदा केली. मौलाना साद अब्दुल्ला यांनी ईदची मुख्य नमाज अदा केली. तर काजी सिद्दीकी मोहियोद्दीन यांनी अरबी खुदबा उपस्थितांना दिला. यावेळी मौलाना मोईनोद्दीन काजमी यांचे धार्मिक प्रवचन झाले. यावेळी त्यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थनाही केली. यावेळी लाखो मुस्लिम बांधवांनी नमाज ईदची नमाज अदा केली.नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकामेकांच्या गळाभेटी घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यात लहानथोरांचा समावेश होता.ईदगाह मैदानावर ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मंडळी, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खा. चव्हाण, आ. सावंत, जिल्हाधिकारी डोंगरे, पोलीस अधीक्षक मिना, उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, विश्वजित कदम आदींची उपस्थिती होती.देगलूर नाका येथील ईदगाह मैदानासह शहरातील वसरणी, वाजेगाव,मुजामपेठ, वाघीरोडवरील नवीन ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. एकमेकांना घरी बोलवत शीरखुर्माही देवून ईदचा आनंद साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदेडमध्ये ईद -उल-फित्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:21 AM
शहर व परिसरात शनिवारी ईद-उल- फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची मुख्य नमाज जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागातील ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी लाखो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुख्य नमाजनंतर खा. अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ठळक मुद्देविश्वशांतीसाठी प्रार्थना : ईदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज अदा